Share Market Today : वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी अनिश्चिततेचे वातावरण पाहायला मिळाले. परकीय गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिट्स अहवालापूर्वी गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध पवित्र्यामुळे मंगळवारी बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स २० अंकांनी घसरून ८४,६७५ वर, तर निफ्टी ३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,९३८ वर स्थिरावला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घटबाजारातील या किरकोळ घसरणीचा फटका गुंतवणूकदारांच्या मालमत्तेला बसला आहे. बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७२.१५ लाख कोटींवरून घसरून ४७१.९३ लाख कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजेच आजच्या एका सत्रात गुंतवणूकदारांचे सुमारे २२,००० कोटी रुपये बुडाले आहेत.
मेटल आणि पीएसयू बँका चमकल्याबाजारात मंदी असली तरी काही क्षेत्रांनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला. मेटल इंडेक्स आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची जोरदार तेजी पाहायला मिळाली. ऑटो इंडेक्समध्येही १ टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे आयटी, रियल्टी, हेल्थकेअर आणि संरक्षण क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसून आला, हे निर्देशांक ०.५% ते १% पर्यंत घसरले.
आजचे 'टॉप गेनर्स' आणि 'लूजर्स'सेन्सेक्समधील तेजीचे शेअर्स
- टाटा स्टील : २.०३% (सर्वाधिक वाढ)
- महिंद्रा अँड महिंद्रा : २.००%
- बजाज फिनसर्व्ह : १.३५%
- ॲक्सिस बँक : ०.९५%
- एसबीआय : ०.८८%
वाचा - डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
सेन्सेक्समधील घसरणीचे शेअर्स
- इटरनल : २.१०% (सर्वाधिक घसरण)
- इंडिगो : १.३७%
- इन्फोसिस : १.१२%
- एशियन पेंट्स : ०.९२%
- अल्ट्राटेक सिमेंट : ०.८४%
Web Summary : Indian stock market faced uncertainty. Investors lost ₹22,000 crore. Metal and PSU banks gained. Tata Steel was a top gainer; IT and healthcare sectors declined.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में अनिश्चितता का माहौल रहा। निवेशकों को ₹22,000 करोड़ का नुकसान हुआ। मेटल और पीएसयू बैंकों के शेयरों में तेजी रही। टाटा स्टील टॉप गेनर रहा; आईटी और हेल्थकेयर सेक्टर में गिरावट आई।